Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन.......

धाराशिव येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन.......                    

                                 


              धाराशिव:  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत आहे. त्याअनुषंगाने अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील भारतीय स्वातंत्र्य लढा किंवा हैद्राबाद मुक्ती संग्राम तसेच गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या विविध अडी-अडचणी, समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने गुरुवार, दि.25 मे रोजी दुपारी 12.00 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

        त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी दि. 25 मे रोजी दुपारी 12.00 वाजता उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपस्थित रहावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे.                                        

Post a Comment

0 Comments