चिवरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ७७℅ मतदान ,उद्या फैसला
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक पोटनिवडणूकीत थेट सरपंच पदासाठी आज गुरूवार दि, १८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, यामध्ये २५०९ मतदार संख्या असुन यापैकी १९२४ नागरिकांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. दिवसभरात सरासरी ७७% मतदान झाले आहे. सकाळपासूनच मतदार राजांनाही आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रानबाहेर रांगा लावल्याचे चित्र होते . किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली,मतदानादिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडु नये व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नळदुग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र नादुरुस्त मतदार यादीमुळे मतदान केंद्रावर व्ययत्य आल्याचे दिसून आले दुपारनंतर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी दुरुस्ती याद्या दिल्यानंतर मतदानाला वेग आला होता.उद्या दि,१९ रोजी मतमोजणी होणार असून सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
0 Comments