अणदूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संगप्पा हागलगुंडे
अणदूर: तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या अणदूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी काँग्रेसचे माजी उपसपंच तथा युवा नेते सुनील चव्हाण यांचे विश्वासू संगाप्पा हागलगुंडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी राजेश देवशिंगकर यांनी भाजपाचे चंद्रशेखर कंदले यांचा ६ मतांनी पराभव करीत निवडूण आले.
तुळजा भवानी कारखान्याची चेअरमन सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच धनराज मुळे, सिद्राम शेटे,सिद्रामप्पा नरे,सिद्धाराम धामोरे,माणिक मुळे, कल्याण कुताडे ,दिवाकर मोकाशे,अनुराधा आलुरे,शिवाजी कांबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी निवड झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण व फटाके फोडून निवडीचे स्वागत करण्यात आले.
0 Comments