श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आजपासून दर्शन पासची आवश्यकता नाही !
धाराशिव - महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना यापूर्वी दर्शन पास(Darshan pass) सक्तीचा होता, आता मात्र दर्शनपास घेण्याची आवश्यकता नाही. श्री तुळजाभवानी मंदिरात संस्थान मार्फत भाविकांना धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी मोफत (Free) पास घेणे बंधनकारक होते. अखेर शुक्रवारी दि,२६ पासून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे दिनांक 26 मे पासून भाविकांची दर्शनासाठी होणारी पायपीट बंद होणार होणार आहे. या निर्णयामुळे देवी भक्तांना दिलासा मिळाला आहे.
विश्वस्त समितीच्या परिपत्रक (Circulation) निर्णयानुसार दिनांक 26/05/2023 (शुक्रवार) रोजी पासून धर्मदर्शन व मुखदर्शनासाठी भाविकांना दर्शनपास घेण्याची आवश्यकता असणार नाही असे स्पष्ट केले आहे. दर्शन पासेस बंद करण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सचिन ओंम्बासे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
0 Comments