Hot Posts

6/recent/ticker-posts

लेख विषय - माझी माणसं शब्दांकन: -प्रमोद सुर्यवंशी मालाड मुंबई.

 लेख

 विषय - माझी माणसं

शब्दांकन: -प्रमोद सुर्यवंशी

 मालाड मुंबई.



नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो ,  

     ऐकेकाळी सर्व अस होत की आपण आपली स्वतः ची काळजी करत करत सगळ्यांची काळजी करत होतो. एकमेकांच्या कामी येत होतो सगळ्यांनी सोबत नांदत होतो . 

      सखे सोयरे भांडण तंटा सगळं होते पण आपण एकत्र प्रेमाने राह होतो . त्या काळी आपण सुखी होतो अस म्हणता येणार नाही पण देवाने दिल त्या मध्ये खरचं सुखी संसाराचा गाडा आपण सुखाने देवाचे नाव घेऊन जगत होतो. 

        आपल्या नात्यात तेव्हा गोडवा असे कधी कधी सुख दुःख वाटून घ्याचो. 

        मग काळ आला इंग्रज पोर्तुगीज मुगलांचा तिथे माणसं आपलीशी झाली आणि एकमेकांच्या मदतीला धावत आली या भारत देशाला या आपल्या प्रेम महाराष्ट्र्राला सोडवण्यासाठी सदैव तत्पर होतो. भारताला स्वतंत्र करण्यासाठी अशा लोकांनी किती किती बलिदान दिले . 

      अशी होती माझी माणसं खरोखरचं 

     आजचा काळ म्हणजे धावपळीच जीवन आले आहे. कोण कोणाला ओळखणं पण मुस्किल झालं आहे. आजच्या कलयुगात एकमेकांच्या मदतीला धावत येणे पण एक रहस्य झालं आहे . कोण कोणाला मदत करू की नको अस म्हणतात लोक ही माणसं तस बघायला गेलं की अस वाटतय. काही तरी आपलं कोणी तरी हरवलं आहे. 

       मित्रांनो तुम्हाला सांगतो एक     माझी माणस हरवली आहे या कलयुगात याच पैसाच्या माया जाळ्यात खरचं आहे.

      पहिल्या काळात पैसे धन वैभव सगळं होत पण *माझी माणसं* होती.

        आता आपली माणसं दुरावलीत आणि प्रेमासाठी मुखलीत आहेत.

         आता तर काय म्हणावं तुम्ही जाणतं आहात महामारीचा काळ सुरू आहे . माणसाच्या मनातून आता माणुसकी खरोखरच हरवत चालली आहे . 

      मित्र मंडळीनो जाता जाता एक सांगतो कधी एकमेकांना दुःखवु नका आणि प्रेमाने मोठा संसार थाठा हेच देवा चरणी प्रार्थना करतो .

  एक स्लॉगन आपण नेहमी म्हणत असतो 

   आपली माती आपली माणसं

    तस आजून एक स्लोगन म्हणा  

 माझी नाती माझी माणसं

  हेच माझे शब्द लिहून संपवतो माझा लेख . 

     आनंदात राहा सुखी राहा

              धन्यवाद


प्रमोद सुर्यवंशी

 मालाड मुंबई

Post a Comment

0 Comments