Hot Posts

6/recent/ticker-posts

रक्षकच निघाले भक्षक, ग्रामपंचायत सदस्यांनी व उपसरपंचांनी घेतला घरकुलाचा लाभ - ग्रामस्थाची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार|Guards turned out to be predators, Gram Panchayat members and Sub-Sarpanches took advantage of Gharkula - Villager's complaint to Group Development Officer

 रक्षकच निघाले भक्षक, ग्रामपंचायत सदस्यांनी व उपसरपंचांनी घेतला घरकुलाचा लाभ - ग्रामस्थाची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार


यवतमाळ: उमरखेड तालुक्यातील दराटी येथे घरकुलाचा लाभ गरजवंतांना मिळण्यापेक्षा येथील पदाधिकाऱ्यांनी लाभ उचलला आहे . यामुळे रक्षकच निघाले भक्षक अशी म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थावर आली आहे. येथील ग्रामपंचायतच्या घरकुलांसह ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराची तक्रार ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यामार्फत उपमुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दराटी हे गाव ग्रामीण बंदी भागात आहे. या गावांमध्ये जास्तीत जास्त नागरिक मोल मजुरी करणारे आहेत त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय दराटीच्या सरपंच उपसरपंच व सदस्याच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत कार्यालयात भोंगळ कारभार सुरू असल्याची तक्रारीत म्हटले आहे.2020 पासून 25 एप्रिल 2023 पर्यंत एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. ग्रामसभेतून रोजगार सेवक निवडण्यात आला नाही. एम आर जी एस ही योजना राबवत असताना बोगस व निकृष्ट कामे करण्यात आली गोरगरीब मजुराच्या हाताने काम करून न घेता मशीनच्या साह्याने कामे करण्यात आली. बिल मस्त च्या आधारे काढण्यात आल्याची तक्रारीत नमूद केली आहे.

घरकुल योजना खरोखर गरीब लाभार्थ्यांना न देता धाब्यावर बसून ज्याच्याकडून आर्थिक सहाय्य होईल त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याचा प्रकार येथे घडत असल्याचे येथील ग्रामस्थांनी तक्रारीत म्हटले आहे ,यात उपसरपंच व सदस्यांनी स्वतःच घरकुलाचा लाभ घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. प्रत्येक गाव विकासाच्या अनेक फंडाच्या माध्यमातून कामे करण्यात आली मात्र दर्जाहीन मटरेल वापरून निकृष्ट कामे होत असून याकडे सरपंच व सचिवाने अक्षम दुर्लक्ष केले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, पाणी फिल्टर चे दररोज जमा होणाऱ्य रुपयाचा हिशोब नाही.

गावातील नागरिकांनी सरपंच व सदस्यांना विचारणा केली असता उडवाउडवी चे उत्तरे देत असल्याचे तक्रारीत नमूद केली आहे. या मनमानी कारभाराला त्रस्त झाले आहे. परिणामी या बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन त्वरित संबंधातशी समक्ष चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्रीकडे निवेदनातून केली आहे. नरेंद्र राठोड, प्रकाश घुले, रामसिंग राठोड, मसूद गुलाब ,हुसेन परान आदींसह 250 ग्रामस्थाच्या स्वाक्षरी आहेत. 

Post a Comment

0 Comments