लातूर जिल्ह्यातील रेणापुर तालुक्यातील निवाडा फाटाजवळील घटना
![]() |
मयत रब्बानी शेख व अजय जाधव |
लातुर: कंटेनर व दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना लातूर अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील निवाडा फाट्याजवळ रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून यातील जखमी इसमावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की रब्बानी अजीम शेख (वय 33) राहणार चांडेश्वर तालुका लातूर, व अजय संजय जाधव वय (37) आणि जयराज प्रताप काळे पाटील ,वय(40) राहणार बोंबळी टाकळी हे तिघेजण रविवारी दि(30) रोजी अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे दुचाकी वर (MH25-Av-1036) लग्न समारंभासाठी जात होते. लातूर अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील निवाडा फाट्या जवळील (तालुका रेनापुर) येथील संकेत ढाब्याजवळ त्यांची दुचाकी आली असता त्यांनी कंटेनरला (NL 02 AA 0204) या वाहनाने ओव्हरटेक केला यावेळी दुचाकीस कंटेनरचा धक्का लागून दुचाकी वरील रब्बानी अजीम शेख (राहणार चांडेश्वर) व अजय संजय जाधव (राहणार बेंबळी टाकळी) हे दोघेजण मागील टायर खाली आल्याने जागीच ठार झाले तर जयराज प्रताप काळे पाटील हा गंभीर जखमी झाला. याला लातूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या अपघाताचे नोंद प्रक्रिया संबंधित पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू होती या अकाली अपघातामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments