इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे यांचा जन्मदिना निमित्त मित्र परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान !
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
मंगरूळ :- तुळजापुर तालुक्यातील मौजे इटकळ येथील ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ग्रामीण पत्रकारांना वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करणारे दिनेश भाऊ सलगरे यांचा १२ मे हा जन्म दिवस असल्याने मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लढव्यय्या , संघर्षवादी व चळवळीतील या पत्रकारांच्या यथोचित सन्मान सोहळ्यासाठी पत्रकार तथा धाराशिव बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके यांनी दिनेश सलगरे यांच्या ग्रामीण भागातील शेतकरी , शेतमजूर , उपेक्षित वंचित यांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडून त्या सोडवण्याचा व त्या सोडवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींना भाग पाडल्याचे तसेच इटकळ व परिसराची सकारात्मक ओळख दिनेश सलगरे यांच्यामुळे असल्याचे प्रतिपादन केले तसेच प्रा.अमोल गुड सर यांनी दिनेश सलगरे यांच्या विविध अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे उपस्थित मान्यवरांना दर्शन घडवले व गेल्या दोन दशकापासून अनेकांना सकारात्मक पत्रकारिताच्या माध्यमातून न्याय व हक्क मिळवून दिल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पत्रकार चांदसाहेब शेख यांनी केले तर आभार बालाजी गायकवाड यांनी मानले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अझर मुजावर , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सचिव अब्दुल शेख , मंगरूळ येथील पोलीस पाटील लक्ष्मण माळी , पत्रकार केशव गायकवाड , लियाकत खुदादे ; नामदेव गायकवाड ; बालाजी सोनटक्के ; हुसेन मकानदार ; अफसर शेख ; शिकुर मुजावर; अकील मुजावर; सिद्धेश्वर हन्नुरे यांच्यासह खानापूर; केशेगाव ; अणदूर ; मंगरूळ व ईटकळ परिसरातील नागरिक व मिञ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सत्कार प्रसंगी पत्रकार दिनेश सलगरे यांनी उपस्थित सर्वच मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले. हा अभीष्टचिंतन सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पत्रकार व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
0 Comments