तुळजापूर बाजार समिती सभापती , उपसभापतीपदासाठी कुणाची वर्णी लागणार? इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
२४ मे रोजी होणार निवडणूक !
तुळजापुर: महायुती सरकारने तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर 18 जागी पैकी 14 जागेवर बहुमताने विजय मिळविला आहे, आता सभापती उपसभापती पदाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. नुकताच तुळजापूर बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 24 मे रोजी सकाळी 11 वाजता बाजार समिती कार्यालयात सभापती उपसभापती निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली आहे.
या अगोदर तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची मजबूत पकड होती यंदा मात्र भाजपच्या ताब्यात गेली आहे, यामुळे सभापती उपसभापती पदाची माळ, कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे . सभापती उपसभापती पदासाठी अनेक इच्छुकांनी आपलीच वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी 28 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले तर दुसऱ्या दिवशी 29 एप्रिल रोजी मतदानाचा निकाल घोषित करण्यात आला,यामध्ये भाजपाचे आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुरस्कार पॅनलने 18 जागेपैकी 14 जागेवर बहुमताने दणदणीत विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला चार जागेवर समाधान मानावे लागले आहे.
सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम 24 मे रोजी होणार आहे, निवडणूक विभागाकडून शुक्रवारी दिनांक 12 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार 24 मे रोजी बाजार समिती कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, तुळजापूर बाजार समितीत भाजपा-सेना ( शिंदे गट) युतीचे बहुमत आहे, सभापती ,उपसभापतीपदाची पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत , परंतु पक्षश्रेष्ठीचा अंतिम असणार आहे यामुळे सभापती उपसभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments