Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान

चिवरी  येथे   पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान 


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे ग्रामपंचायतच्या वतीने दि, ३१ रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील सुदोक्षणा रत्नाकर येवते व मनीषा सुभाष झिंगरे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला व बाल विकास मंत्रालयाने यावर्षीपासून ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत, ग्रामीण भागातील ज्या महिलांनी उत्तम भरारी घेत समाजासाठी मोलाची योगदान दिले आहे अशा महिलांना ' पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल अशी घोषित केले आहे. याच आदेशावरून तुळजापूर तालुक्यातील चिवरी गावातील सुदोक्षणा रत्नाकर येवते व मनीषा सुभाष झिंगरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.  यावेळी सरपंच शिवकन्या बिराजदार, अंगणवाडी कार्यकर्त्या अनिता बिराजदार ,लक्ष्मी मेंढापुरे , ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments