शेतकऱ्यांचे आभाळाकडे ; तर वारकऱ्यांचे पंढरीकडे डोळे वेळेवर पेरणी झाली तर मिळणार पंढरीच्या वारीचा आनंद
तुळजापुर/राजगुरु साखरे : तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून शेतकऱ्यांचे आभाळाकडे तर वारकऱ्यांचे पंढरीच्या वाटेकडे डोळे लागले आहेत. वेळेवर पाऊस पाणी झाला तरच शेतकऱ्यांना पंढरीच्या वारीचा आनंद घेता येणार आहे. गतवर्षी तालुक्यात रोहिणी नक्षत्रात पुरेसा पाऊस झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्या लवकर झाल्या होत्या, मात्र यावर्षी रोहिणी नक्षत्र कोरडेठाक गेले त्याचबरोबर मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा झाला तरी पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
पेरणी आणि वारी जवळपास एकाच वेळी येते वारीला जाण्यासाठी पेरणी आणि इतर शेतातील सर्व कामे आटोपुन निघण्याची तयारी शेतकरी करत असतात. यंदाच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार असे हवामान खात्याने वर्तवली होते, मात्र मृग नक्षत्र निघून आठवडा उलटला तरी पावसाचे आगमन झाले नाही, दिवसभर सोसाट्याचा वारा सुटत आहे, उकाडा संपण्याऐवजी वाढतच चालला आहे. वेळेवर पाऊस झाला तर पेरणी होईल व पंढरीची वारी घडेल याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.
पाऊस वेळेवर नाही झाला तर शेतकऱ्यांनी ठरवलेली वेळापत्रक कोडमलते की काय ? अशी शंका शेतकरी, वारकरी यांना येत आहे सध्या शेतकऱ्यांचे आभाळाकडे तर वारकऱ्यांचे पंढरीच्या वाटेकडे डोळे लागले आहेत.
बालाघाट न्यूज टाइम्स व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा
https://chat.whatsapp.com/FcGGTbYFLNM84EcvIQJaPd
0 Comments