Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात निकृष्ट दर्जाच्या कामाचा महापूर बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्याकडून चौकशीची मागणी ठेकेदार तुपाशी गाव उपाशी अशी अवस्था पश्चिम भागाची

 माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात निकृष्ट दर्जाच्या कामाचा महापूर
  बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्याकडून चौकशीची मागणी
 ठेकेदार तुपाशी गाव उपाशी अशी अवस्था पश्चिम भागाची

नातेपुते प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील गावामध्ये दलित वस्तीतील कामे पंधरावा वित्त आयोगाच्या फंडातून, जल जीवन योजनेतून झालेली कामे जिल्हा परिषद मार्फत झालेली रस्ता कॉंक्रिटीकरण गटराची, पेवर ब्लॉक बसविणे, शेडी वर्क, पाणीपुरवठा पाईपलाईन, पाण्याची टाकी अशी अनेक कामे राजकीय लोकांचे बगलबच्चे असलेले प्रस्थापित   ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत व चालू असून त्याच गावातील स्थानिक ठेकेदार असल्याने त्या ठेकेदाराचा त्या गावात दबाव व राजकीय ताकद असून त्या ठेकेदाराबद्दल कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने या ठेकेदारांनी अनेक कामे निकृष्ट दर्जाची केले असून अनेक  गावात दलित वस्तीचा निधी ठेकेदार सरपंच ग्रामसेवक व संबंधित बांधकाम  विभागाचे कर्मचारी यांच्या संगणमतानी इतरत्र वळवली जात आहेत अनेक ठेकेदारांच्या सल्ल्यानेच गावात कोणती कामं आणायची ठेकेदाराला निकृष्ट दर्जाचे काम केल्यावर कोणत्या कामात जास्त फायदा होईल  अशी कामे ठेकेदारच सरपंचांना सुचवून वरिष्ठ राजकीय लोकांच्या सहकार्याने कामे मंजूर करून घेतली जातात व मंजूर झालेल्या कामाचा आलेल्या निधीचा गाजावाजा होतो मोठ्या थाटात उद्घाटन केले जातात केलेल्या कामाचाही उद्घाटन होते परंतु कामे किती दिवस टिकतात याकडे खासदार आमदार लोकप्रतिनिधींचे लक्ष नसते एकटाच ठेकेदार तुपाशी आणि गाव विकासापासून उपाशी अशी अवस्था पश्चिम भागातील गावात चालू आहे ठेकेदाराबद्दल राजकीय नेत्यांकडे तक्रार आल्यास तू ठेकेदार कोणाचा आहे हे पाहिले जाते आपलाच असेल तर अरे जाऊदे आपलाच आहे असे म्हणून ठेकेदाराला बळ दिले जाते त्यामुळे शासन दरवर्षी विकास कामावर कोटी रुपये खर्च करूनही ठेकेदार करत असल्याने निकृष्ट दर्जेच्या कामामुळे गावाचा विकास खुंटतो त्यामुळे सर्वसामान्य  लोकांना त्याचा काहीच फायदा होत नाही माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील सर्व गावातील झालेल्या व चालू असलेल्या कामाची चौकशी होऊन प्रस्थापित ठेकेदारांच्या इस्टेटची चौकशीची मागणी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे करणार असल्याचे बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांनी बालाघाट न्यूज टाइम्स शी  बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments