श्रीपतराव भोसले हायस्कूलचे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत दैदिप्यमान यश ,97.20% निकाल !
धाराशिव :येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीपतराव भोसले हायस्कूलने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत अपेक्षेप्रमाणे याही वर्षी यशाची परंपरा कायम ठेवली आहे .
महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली मराठी शाळा म्हणून श्रीपतराव भोसले हायस्कूल ची ओळख आहेच ;पण त्याचबरोबर कला ,क्रीडा या क्षेत्रातील यशाबरोबरच प्रशालेने माध्यमिक शाळा न्त परीक्षेमध्ये यशाची आपली परंपरा कायम ठेवली आहे .
इयत्ता दहावीचे बोर्ड परीक्षेला एकूण 826 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते . एका शाळेमध्ये एवढे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसवणारी महाराष्ट्रातील श्रीपतराव भोसले हायस्कूल एकमेव शाळा आहे .
एकूण 826 पैकी 822 विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालान्त परीक्षा दिली होती.एकूण निकाल 97.20 %असा लागला असून
100 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेले प्रशालेचे चार विद्यार्थी असून भोईटे प्रणव बलभीम -प्रथम , घेवारे प्रार्थना दिनेश - द्वितीय , पाटील सृष्टी गुणवंत - तृतीय , बुर्ले अजिंक्य बिभीषण चतुर्थ आला आहे .
तर विशेष प्राविण्य प्राप्त 461 विदयार्थी ,प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 215 तर द्वितीय श्रेणीत 99 व पास श्रेणीत 24 विद्यार्थी असून 90% पेक्षा जास्त गुण घेतलेले 190 मुले तर 95 टक्के पेक्षा जास्त गुण घेणारे 81 विद्यार्थी आहेत . त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेच्या वतीने करण्यात आले .
संस्थेचे अध्यक्ष सुधीर (अण्णा ) पाटील , प्रशासकीय अधिकारी आदित्य (भैय्या ) पाटील संस्था सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील तसेच प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख ,उपप्राचार्य घार्गे एस .के ,उपमुख्याध्यापक कोळी एस.बी .इयत्ता दहावीचे पर्यवेक्षक श्री इंगळे वाय.के ,श्रीमती गुंड बी .बी 'शेटे टी.पी ' जाधव आर . बी . , गायकवाड के .वाय , देशमुख डी.ए यांनी या यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .तसेच इयत्ता दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे कौतुक प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापकांनी केले .इयत्ता दहावीचे पर्यवेक्षक श्री . इंगळे वाय. के व गुणवत्ता सुधार समितीचे प्रमुख भुसे एम . एस यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष सुधीर ( अण्णा ) पाटील यांनी केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व या गुणवंत विद्यार्थ्यांना शहरातच श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन या निमित्ताने केले . कोटा , दिल्ली , हैद्राबाद येथील तज्ञ प्राध्यापक वर्ग फोटॉन बॅच व फिनमिनल बॅच 11 व 12 वी साठी नीट व जेईई परीक्षेची उत्तम तयार करून घेतात , त्यामुळे बाहेर पालकांनी आपल्या मुलांना पाठवून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे , असे मत सुधीर ( अण्णा) यांनी पालकांपुढे व्यक्त केले .
0 Comments