Hot Posts

6/recent/ticker-posts

हंगरगा येथील पोदार जम्बो किड्स शाळेत बाल वारकरी दिंडी उत्साहात.

हंगरगा येथील पोदार जम्बो किड्स  शाळेत बाल वारकरी दिंडी उत्साहात.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर :  तुळजापूर परिसरातील हंगरगा येथील पोदार जम्बो किड्स मध्ये दि,२८ रोजी प्ले ग्रुप, नर्सरी,  ज्यूंनिअर केजी,  सिनिअर केजी. च्या  चिमुकल्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी निमित्त बालवारकरी दिंडी आयोजित करण्यात आली. या दिंडीमध्ये सर्व मुलांनी विविध वारकरी, विठ्ठल रुक्मिणी, संत वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली . यामध्ये सर्व पालक  संचालक संजय जाधव सर, सौ. निर्मला जाधव मॅडम, दिपाली जाधव मॅडम,देशमुख मॅडम, चव्हाण मॅडम, गौरकर मॅडम, करमुसे मॅडम, ऐश्वर्या मॅडम, तसेच सर्व सहकारी कर्मचारी सौ.सुरेखा जमादार मावशी  यांनी परिश्रम घेतले, पोदार जंबो किड्स हि ग्रामीण भागातील सर्वात पहिली शाळा आहे ज्याचा पाया CBSE असून पोदार आंतरराष्ट्रीय एज्युकेशन नेटवर्क च्या माध्यमातून  सर्व सोयींनी अद्ययावत  तुळजापूर परिसरातील पालकांनी शाळा पाहण्यासाठी व मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची पसंती आहे.


बोलक्या भिंती, बौद्धिक खेळणी, खेळाचे मैदान, प्रशिक्षित शिक्षिका हे प्रमुख वैशिष्ठे आहे. यासाठी लोटस पब्लिक स्कूल, रोटरी क्लब चे अध्यक्ष व जे.बी. कंप्युटर्स संचालक श्री  संजय जाधव यांच्या संकल्पनेतून ही शाळा उभारली आहे.

Post a Comment

0 Comments