Hot Posts

6/recent/ticker-posts

बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्यातील जनता सुखी व समाधानी होऊ दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाला साकडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागोपाठ दुसऱ्या वर्षी सपत्नीक केली विठुरायाची पूजा, नगरच्या भाऊसाहेब काळे व मंगल काळे या दाम्पत्यास पूजेचा मान 

 बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्यातील जनता सुखी व समाधानी होऊ दे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाला साकडे



पंढरपूर/ प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात संपन झाली.

आज आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या भक्तीत तल्लीन लाखों वारकरी पंढरीत दाखल झाले असून पहाटेपासून दर्शनासाठी पंढरीत मोठी रांग लागली आहे. विठु भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे - विठूनामाचा गजर सुरू केला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलांची शासकीय महापूजा पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभान्यात पार पडली.

आषाढी  एकादशीच्या शुभदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटूंब सहपरिवार विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्यांची मनोभावे आराधना करण्याची संधी मिळाल्याबद्दल यावेळी त्यांनी विठुरायाचे आभार मानले.

राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील सर्व जनता   सुखी व समाधानी होऊ दे व बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, हे राज्य सुफलाम सुफलाम होऊ दे असे अशी मागणी,  असे साकडे आपण विठुरायाच्या चरणी मागितले, विठुरायाला घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यंदा राज्यातील युती सरकारला एक वर्षे पूर्ण होत असून गेल्या वर्षभरात अनेक विघ्न अडचणी आल्या मात्र विठुरायाच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरळीतपणे करता येणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

 पंढरपुर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदीरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना ससांगितले. तसेच पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी तर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १०८ कोटी रुपये मंजूर केल्याचे यासमयी जाहीर केले.


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार भरतशेठ गोगावले आमदार समाधान अवताडे, आमदार मंगेश चव्हाण, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे गहिनीमहाराज औसेकर तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते.


कोण आहेत मानाचे वारकरी भाऊसाहेब काळे व सौ मंगला काळे

                                                                         अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांना विठ्ठल-रूक्मिणीच्या महापुजेचा मान मिळाला आहे. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे, यासाठी ते २८ जुन बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहिले होते. गेल्या तीस वर्षांपासून कोरोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता न चुकता त्यांनी जोडीने वारी केली असल्याचे सांगितले आहे.                                                      

🚩🚩   ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️🚩🚩    

Post a Comment

0 Comments