ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून बेदम मारहाण, तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव: जिल्ह्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका होऊन सहा महिने उलटले तरी त्यावेळी निर्माण झालेले शत्रुत्व अजूनही संपताना दिसत नाही या प्रकारातूनच लोहारा तालुक्यातील एकोंडी येथील एकास लोखंडी पट्टी, दगडाने काठीने मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना दि,१३ जून रोजी लोहारा तालुक्यातील पेठ सांगवी शिवारात घडली. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लोहारा तालुक्यातील एकोंडी येथील विश्वनाथ लक्ष्मण सूर्यवंशी हे पेठ सांगवी शिवारातील बालाजी सोमवंशी यांच्या शेताजवळ मंगळवारी उभारले होते. यावेळी रवींद्र जाधव , कृष्णा जाधव, कमलाकर जाधव या तिघांनी गावातील विश्वनाथ सूर्यवंशी यांना ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या कारणावरून लोखंडी पट्टी दगड आणि काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी विश्वनाथ सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३ जणाविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments