तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या मंत्रिमंडळासह तुळजापुरात, उद्या तुळजापूरमध्ये बीआरएस पक्षाची शक्ती प्रदर्शन
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
तुळजापूरः भारत राष्ट्र समिती त्याचे अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव मंत्रिमंडळातील १० सदस्यासह मंगळवारी (दि.२७) रोजी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे येणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य मीडिया समन्वयक प्रशांत नवगिरे यांनी दिली.
बीआरएसचे अध्यक्ष राव मंगळवारी सकाळी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत मंदिर व वारकऱ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केल्यानंतर दुपारी २:३० वाजता ते तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेणार आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री तुळजाभवानी देवीचे राज्यात कुठे होती फक्त आहेत या दौऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री राव वारकरी व भक्तामध्ये आपला पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सोमवारी (दि.२६) रोजी ते कारने सोलापूर येथे येऊन तिथे मुक्काम करणार आहेत. तिथे उस्मानाबाद (धाराशिव) व सोलापूर जिल्ह्यातील पक्ष वाढीबद्दल विविध मान्यवरांशी चर्चा करणार असून पक्षप्रवेश करणाऱ्यांनाही सोमवारी चर्चेसाठी सोलापूर येथे बोलविल्याचे वृत्त आहे.
उद्या ते उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदान आलेला आहे. उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातून बी आर एस मध्ये कोण कोण प्रवेश करणार याकडे जिल्ह्याचे व संपूर्ण तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.या दौऱ्यात पक्षाच्या गळ्याला कोण कोण लागते याची उत्सुकता दोन्ही जिल्हावासियांना लागली आहे.
0 Comments