मतदारांची माहिती संकलित करण्यासाठी BLO APP कार्यान्वित,नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन.
उस्मानाबाद,दि,12 :- भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे.लोकसभा व विधानसभा सार्वत्रीक निवडणूकांच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने दि.०१.०१.२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत अद्यावत मतदार यादी करणेबाबत सूचना प्राप्त आहेत. ही मतदार यादी विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम राज्यात १ जुन ,२०२३ पासून सुरु झाला आहे.
त्यानुषंगाने,मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना मतदार नोंदणी विषयक कामकाज करण्यासाठी विकसित करण्यात आलेले BLO App मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांनी प्रभावीपणे कामकाज करून जास्तीत जास्त मयत/स्थलांतरीत/दुबार/बेपत्ता मतदाराची माहिती भरणार आहेत तर त्यासाठी सर्व जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
तसेच,मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने (a) गैरहजर,पत्यावर आढळुन न आलेले मतदार (b) स्थलांतरीत (शिक्षण,नोकरी,धंदा) इत्यादी कारणामुळे बाहेरगावी असणारे मतदार या मतदारांची यादी तहसिलदार यांचे कडे सादर करण्याची कार्यवाही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO करणार आहेत. त्यासाठी त्यांना घरोघरी भेटी वेळी ॲप मध्ये माहिती भरण्यासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.यानंतर तहसिलदार यांनी नमुना 7 ची नोटीस स्पीड पोस्टाव्दारे पाठविण्याची कार्यवाही करतील.कोणताही मतदार विहित केलेल्या पध्दतीने सुनावणी घेतल्याशिवाय वगळण्यात येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.असेही डॉ.ओम्बासे यावेळी म्हणाले.
0 Comments