Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे सहाय्यक आयुक्त यांचे आवाहन

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

 उस्मानाबाद,दि,12, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील कार्यरत शासकीय मुला-मुलीचे वसतिगृहातील रिक्त 518 जागांसाठी 2023-24 या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रीया ऑफलाईन पध्दतीने मॅन्यूअली  राबविण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांची पहिली निवड यादी अंतिम करून 14 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम तारीख 23 जुलै  राहील तसेच रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 26 जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार तर 2 ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रीया सुरू राहील. जिल्हयातील आठवी ते दहावी त्या 180 जागा रिक्त आहेत.

इयत्ता दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये  तसेच बी.ए., बी.कॅाम, बीएससी व पदविका एम.कॉम,एम.एससी अशा अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतू व्यवसायीक अभ्याक्रमामध्ये प्रवेशित नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असून पहिली निवड यादी अंतिम करून 7 ऑगस्ट  रोजी प्रसिध्द करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम तारीख 17 ऑगस्ट  राहील तसेच रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 23 ऑगस्ट  रोजी प्रसिध्द करण्यात येणार तर 31 ऑगस्ट पर्यंत प्रवेश प्रक्रीया सुरू राहील. तेव्हा प्रचलित शासन निर्णयाच्या अधिन राहून गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार रिक्त जागा भरण्यात येतील विद्यार्थ्यांनी संबधिती वसतिगृहाचे गृहपाल यांचेकडून अर्ज प्राप्त  करून घेवून परिपूर्ण अर्ज ऑफलाईन पदध्तीने गृहपाल यांचेकडे जमा करावा.सर्व विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश विहीत मुदतीत निश्चित करावा असे अहवान समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments