Hot Posts

6/recent/ticker-posts

आपत्कालीन पीक व्यवस्थापन काळाची गरज - श्री सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी

आपत्कालीन पीक व्यवस्थापन काळाची गरज - श्री सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी 
नातेपुते प्रतिनिधी /विलास भोसले : बदलत्या हवामान घटक परिणाम मागील काही वर्षापासून आपणास सातत्याने अनुभवास येत आहे. पावसाच्या अनियमितते मुळे शेती व्यवस्थापनात मोठे अहवान निर्माण झाले आहे. पेरणीपूर्व पेरणीनंतर कोणत्याही अनक्षेपीत किंवा आकस्मिक प्रतिकृल हवामानाची परिस्थिती येणे म्हणजे आपत्काळ व त्यावर मात करणे व त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे म्हणजे आपत्कालीन पीक व्यवस्थापन होय. माळशिरस तालुक्यात ८जूलै अखेर गेल्या वर्षी व सरासरीच्या ११% म्हणजे ४९ मिली पाऊस पडला आहे.

 अपेक्षीत उत्पादनासाठी खरीप हंगाम पेरणी कालावधी १५ जून ते १५ जुलै हा आहे व पेरणीस योग्य ८० ते १०० मिली पाऊस अपेक्षीत असतो . तालुक्यात आत्पकालीन पीक परिस्थिती व्यवस्थापन निर्माण झाली आहे. तरी या परिस्थितीत खालील प्रमाणे खरीप पीक व्यवस्थापन करावे व हे व्यवस्थापन सर्व पिकास लागू आहे. १ पीक हंगाम सुरु होताना दुष्काळ - यामध्ये नागेभरणे , पून रर्लागवड , आच्छादनाचा वापर करणे, विरळणी , १% युरिया वापर करणे , प्रवर्तकाचा वापर , पुरक व संरक्षित सिंचनाचा वापर करणे २ - मध्यावती दुष्काळ व पावसाचा खंड - धुळीचे आच्छादन करणे, १% युरिया फवारणी करणे , आच्छादनाचा वापर , २% पोटेशिअम नायट्रेट फवारणी करणे , पाने कमी करणे, संरक्षीत पाणी ठिबक वापर . ३- मान्सून ची वेळेपूर्वी माघार - विरळणी करणे, ठिबकचा वापर ' संरक्षीत पाणी ठिबकचा वापर , वेळेपूर्वी चाऱ्यासाठी काढणी, परिपवक्तेला काढणी करणे.            आपत्कालीन पीक नियोजनामध्ये योग्य पीक निवड पिकाचे वाणनिवड , सुधारीत शिफारस पीक पद्धतीचा वापर इत्यादीचा अवलंब सर्व पीकासाठी अवर्षण प्रवन कालावधीत करून उत्पादकता स्थिरता येण्यास मदत होते त्यासाठी खालील व्यवस्थापनाचा अवलंब करावा .

 १- जमिनीच्या खोलीनुसार पीक निवड व नियोजन - १७ ते २२ से.मी खोल व ३० ते ४० मिली पाऊस साठी हुलगा, मटकी बाजरी , बाजरी मटकी हुलगा (१:२ ) सरळपीक व आंतरपीक लागवड करावी. २२ ते ४५ से.मी खोल जमिनीसाठी व ४० ते ६० मिली पाऊस साठी सुर्यफुल, बाजरी तूर, गवार सरळ पीक व बाजरी + तूर ,सुर्यफुल + तूर आंतरपीक लागवड करावी .  ४५ से.मी ते ६० से.मी खोलीसाठी सोयाबीन तूर लागवड करावी २- आंतरपीक पीक पद्धती वरील प्रमाणे १:२ प्रमाणात लागवड पेरणी करून एका तरी पीकाचे उत्पादन घेता येईल.

 ३ दुबार पिक - ही पिक जमिनीची खोली ६० ते ९० से.मी खोल जमिनित खरिप नंतर रब्बी मध्ये उडीद , मुग ,चवळी नंतर ज्वारी, करडई, सूर्यकुल पीक घ्यावे . ४- पिकाची फेरपालट - हरभरा नंतरच ज्वारी, ज्वारी व हरभरा नंतर करडई घेतल्याने ज्वारी ३५% व करडईत १४ % उत्पादनात वाढ होत. ५- मुलस्थानी जलसंधारण - पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनित मुरविणे साठी उताराला आडवी मशागत व पेरणी,  रुंद सरी वरंबा, डेड फरो, एक आड एक सरी काढणे , आच्छादनाचा वापर केल्याने जमिनित पाणी मुरण्याची शक्यता कितेक पट्टीने वाढून शाश्वत उत्पादनास मदत होते. ६- सुधारित पीक व्यवस्थापन - अवर्षणाची त्री .वता कमी करण्याचा एक खात्रीशीर उपाय मध्ये प्रामुख्याने वेळेवर पेरणी, पेरणीतील अंतर, दोनचांड्याने खत व बियाणे पेरणी, सुधारित शिफारस जातीचा वापर, बीज प्रक्रिया ' हेक्टरी रोपांची संख्या, खताचा वापर, आंतरमशागत ' आच्छादनचा वापर यामुळे खरिप पीक अवर्षनास तग धरून १५ ते २०% उत्पदनात वाढ होते. ७- खताचा वापर - शेणखत, कंपोस्ट, हिखळीचे खते वापर केल्याने पाणी मुरण्याचे प्रमाण ४पटीने वाढून जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढल्याने अवर्षन मध्ये पीक तग धरून राहतात. ८- अवर्षनास तग धरणारी पिके व वानाचा वापर  - बाजरी - अधिशकती ' धनशक्ती मुग - फुले चेतक, फुले वैभव  मटकी - फुले सरीता, उडीद - टीएयू -१ टीपीयू-४, सोयाबीन -फुले अग्रणी, फुले संगम , फुले संगम , फुले किमया, जेएस -३३५ तूर - फुले राजेश्वरी , गोदावरी भिमा सुर्यफुल -फुले भास्कर, फुले रविराज भूईमुग - जेएल -२४, टी ऐजी -२४ ,२६ मका - राजश्री, फुले महर्षी या वाणाची निवड करावी. 

९- .आधूनिक सिंचन पद्धतीचा व संरक्षीत पाण्याचा वापर- पेरणी, फुटवे फुटण्याची अवस्था प्रफुल्ल वाढीची वेळ, फुलोरा , दाणे भरण्याची आवस्था वेळी उपलब्ध संरक्षीत पाणी ठिंबक ,तुषार , मटका सिंचन पद्धतीने दिल्यास शाश्वत उत्पादन येणेस मदत होते. १०- पिक आवशेषाद्वारे व प्लॅस्टीक आच्छादनाचा वापर- बाप्पीभवनामुळे उडून जाणारे ७०% ओल साठविणे साठी शेतातील उपलब्ध पीक अवषेश व प्लॅस्टीक आच्छादनाचा वापर केल्याने २५ ते३० मिली ओलावा बचत होऊन ३० ते ४०% तुणनात्मक उत्पादनात वाढ होते . ११- फवाऱ्याद्वारे खंताचा वापर -२% युरिया, ०.५ % झिक सल्फेट, १% पोटॅशिअम नायट्रेट ,२% डीएपी फवारणीसाठी वापर केल्याने उपलब्ध ओलाव्यासह पानातील अन्न क्रिया गतीमान होते. १२- परावर्तकांचा बाप्परोधकाचा वापर - केओलीन , पांढरा रंग खडू पावडर, ची ५% फवारणी दिल्यास सुर्यप्रकाश पानावरून परावर्तीत होऊन ताण सहन शक्ती वाढते. १३- हेक्टरी रोपांची संख्या कमी करणे - .पेरणीनंतर अवर्षन परिस्थितीत फुलोरा व दाणे भरणे वेळी  एकतृतीयाश व २५ ते ३०% रोपांची संख्या अवर्षन वेळी करून शाश्वत उत्पादन घेता येते.

 १४- पानांची संख्या कमी करणे- जमिनीलगत ताटावरील खालील ४ ते५ पाने कमी केल्याने अवर्षनाचा ताण कमी करण्यास मदत होते. १५- शेततळे वापर -  पृष्टभागावरील २० ते ४० पाणी वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर संरक्षीत पाणी व भुगर्भातील पाणी पातळी वाढणेस मदत होऊन अवर्षनावर मदत होते. १६- आपत्कालीन पीक बदल - जमिनीच्या खोलीनुसार शिफारस पीक , मिश्र पिक , आंतरपीक व शिफारस व कमी कालावधीत येणाऱ्या जाती वापर करून अपेक्षीत शाश्वत उत्पादन घेता येते .       सद्य परिस्थितीत बदलते हवामान घटक अवर्षन आपत्कालीन परिस्थितीत वरील १ ते १६ शिफारस बाबीची उपाययोजना अंमलबजावणी केली तर खरीप हंगाम वाया न जादा शाश्वत , अपेक्षीत उत्पनाचे जवळपास पोहचण्यास मदत होईल यासाठी वरील महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी बाबीचे आयोजन नियोजन अंमलबाजणी करण्याचे आहवान मंडळ कृषि अधिकारी नातेपुते श्री सतीश कचरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments