Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉक्टरडे निमित्त रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने डॉ जयश्री बावकर यांचा सन्मान

डॉक्टरडे निमित्त रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने डॉ जयश्री बावकर यांचा सन्मान


लातुर: १जुलै डॉक्टर डे निमित्त रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने  मौजे चिंचोली बल्लाळनाथ येथे शा.वैद्यकीय अधिकारी डॉ जयश्री बावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन महिला प्रमुख मिनाक्षी शेटे यांनी शुभेच्छा व सत्कार करण्यात आला.              विशेष आज डॉक्टर डे निमित्त साधून आजच पदभार स्वीकारला जेथे डॉक्टर शासकीय सेवेत न येता स्वतःची खाजगी हाॅस्पीटल थाटून पैसे कमावण्यासाठी धडपडत असतात पण् त्याला बगल देत डॉक्टर जयश्री बावकर यांनी शासकीय सेवेत येवून एक सामाजिक बांधिलकी जोपासली व ग्रामीण भागातील रुग्ण सेवेला महत्व देऊन पदभार स्वीकारला व रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा घडावी यासाठी घेतलेल्या निर्णयाची दखल म्हणून  समिती च्या महिला प्रमुख मिनाक्षी शेटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पो.नि.सुधाकर बावकर, रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्रचे प्रमुख ॲड विजयभाऊ पंडित, उपाध्यक्ष संजय सुरवसे, सहसचिव संतोष सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments