सदाशिवराव माने विद्यालयात गुरु पौर्णिमा गुरूंच्या सन्मानाने साजरी
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः|
गुरुः साक्षात्परब्रह्मा
गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः
अकलूज: 'गुरुपौर्णिमा' हा भारतीय सांस्कृतिक परंपरेतील एक महत्वाचा सण संपूर्ण भारतात हा मोठया उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच आज गुरुच्या गौरव करण्याचा आजचा दिवस. सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे गुरुप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस गुरूंचा सन्मान करून साजरा करण्यात आला.याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज चे संचालक बाळासाहेब सणस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील इयत्ता दहावी अ च्या विद्यार्थ्यांनी केले होते. सुरुवातीला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. विशाखा राजभोज हिने केले यामध्ये तिने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरुचे असणारे महत्व सांगितले. यानंतर विद्यालयाचा सयाजीराजे वाद्यवृंदाच्या वतीने स्नेहा शिंदे मॅडम यांनी गुरुप्रती 'गुरु विन दुसरा नाही कोणी या जगती' हे गौरव गीतसादर केले. याप्रसंगी सुरुवातीला संचालक सणस यांचा सत्कार मुख्याध्यापक अमोल फुले सर यांचे हस्ते करण्यात आला. तदनंतर सर्व गुरुजणांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सन्मानानंतर विद्यार्थी मनोगतामध्ये चि. सुमित खामगाळ व विद्यार्थिनी कु. स्मिता वाघमारे यांनी गुरुप्रती आपले विचार व्यक्त केले. याविशेष प्रसंगी कोळेगाव येथे झालेल्या एन.सी.सी कॅम्प मध्ये विविध स्पर्धेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व एनसीसी प्रमुख रणनवरे एस एच यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उप प्राचार्य संजय शिंदे, पर्यवेक्षक राजन चिंचकर, उमेश बोरावके, प्रमिला राऊत, शिक्षक प्रतिनिधी संजय नागणे धनंजय मगर, मार्गदर्शक वर्गशिक्षिका प्रतिभा सावंत सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आयुष सुरणीस, तन्मय एकतपुरे, समीक्षा भोसले, कीर्ती सूर्यवंशी यांनी तर तनिष्का खडके हिने आभार मानले.
0 Comments