Hot Posts

6/recent/ticker-posts

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अधीक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी : भीम -अण्णा सामाजिक संघटनेची मागणी

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अधीक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी : भीम -अण्णा सामाजिक संघटनेची मागणी 

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

उस्मानाबाद: तुळजापूर तहसील कार्यालय येथे दि,१९ रोजी तहसीलदार साहेब तसेच मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात मौजे मंगरूळ येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अधिक्षक यांच्याकडून मारहाण झाले प्रकरणाबाबत. मौजे मंगरूळ येथे असलेल्या संत गाडगेबाबा आश्रम शाळेत गेल्या अनेक महिन्यापासून अधीक्षकाद्वारे तेथील राहत असलेल्या विद्यार्थ्यांना जबर मारहाणी बाबत आपणास कळविण्यात येते की, दि.16 जुलै रोजी तेथील मुख्याध्यापक यांनी केलेले FIR प्रमाणे तेथील अधिक्षक गिरासे योगेंद्र भीमसेन या शिक्षकाने दोन विद्यार्थ्यास जबर मारहाण करून जखमी केले त्याबाबत तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये कलम 324 अल्पवयीन न्याय कायदा 2015 अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 नुसार गुन्हे नोंद आहेत.

     सदरील प्रकरणातील संदीप शिवाजी कांबळे आणि ऋषी अमोल शिंदे हे मागासवर्गीय आहेत. त्यामुळे सदरील शिक्षकाकडून जाणीवपूर्वक त्यांच्यावर मारहाण करून त्यांना शिव्या देण्यात आल्या. सदरील घडलेला प्रकाराच्या विरोधात तेथील मुख्याध्यापक यांनी स्वतःत्या शिक्षकाविरोधात FIR नोंद करून त्यांना अटक केली परंतु त्याची जामीन घेऊन तो शिक्षक परत नोकरीवर रुजू झाला आहे.

     सदरील प्रकरणामुळे विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यास तयार नाही. त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहण्याचे तयारीत आहे. अशाप्रकारे गेल्या कित्येक वेळेस तेथील विद्यार्थ्यासोबत घडत आहे. त्याच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून न्यायव्यवस्थेत देखील तेथील विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. सदरील प्रकरणातील शिक्षकास कठोरात कठोर शिक्षा व्हावी व त्यांना निलंबित करण्यात यावे. शिक्षक निलंबित नाही झाल्यास भिम -अण्णा सामाजिक संघटना उग्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी नम्र विनंती. या शिक्षकास कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा या बाबत निवेदन देण्यात आले.या वेळी भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सल्लागार समिती प्रमुख तानाजी (भाऊ)कांबळे जिल्हाध्यक्ष जयराज (भाऊ) क्षीरसागर,तुळजापूर तालुका अध्यक्ष :- राम (भाऊ) कांबळे,किरण (भाऊ) कांबळे, प्रतीक डोलारे, शक्ती गायकवाड  इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments