घटसर्प व आंत्रविषार रोग नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद : पावसाळ्याला प्रारंभ झाला असून वातावरण व खानपणातील आहारातील बदलाचा परिणाम जनावरांवरही जाणवतो. पावसाळ्यात जनावरांवर मुख्यतः घटसर्प व आंत्रविषार (हगवण) रोगाचा प्रादुर्भाव होतो. वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना अथवा उपचार न झाल्यास लाख मोलाचे जनावरे दगावतात. पशुपालकांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे.
जिल्हा परिषदेला आंत्रविषार रोग नियंत्रणासाठी 52 हजार तर घटसर्प रोग नियंत्रणासाठी 76 हजार असे सुमारे 108000 असे डोस उपलब्ध झाले असून जिल्ह्यात लसीकरणाला प्रारंभ झाला असून त्यास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन हा आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक लोकसंख्या या व्यवसायावर अवलंबून आहे. पावसाळ्याच्या तोंडावर घटसर्प या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून येतो.याला हेमोरॅजीक सेप्टिसिमिया आजार सुद्धा म्हटले जाते. हा आजार जनावरांना जून ते जुलै महिन्यात दुधाळ जनावरांना होतो. विशेषतः म्हशींमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणात आढळला जातो.हा रोग पाश्चुरेलामल्टोसिडा या विषाणूमुळे होतो. आंत्रविषार हा आजार मुख्यत्वे पावसाळ्यात शेळ्या व मेंढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यापूर्वी या रोगाचे लसीकरण होणे गरजेचे असते.लसीकरणाला प्रारंभ :- जिल्हा परिषदला ७६००० डोस उपलब्ध
घटसर्प प्रादुर्भावाची कारणे:पावसाचे पाणी साचलेल्या ठिकाणी या रोगाचे विषाणू आढळतात व अस्वच्छ ठिकाणी जनावरे बांधल्यास, लांबचा प्रवास किंवा अधिक काम करून थकलेल्या जनावरांवर या रोगाच्या विषाणूंचा हल्ला होतो. हा रोग संसर्गजन्य असल्याने वेगाने फैलाव होतो. आजारी जनावरांच्या संपर्कात चारा धान्य व पाण्याचे सामूहिक सेवन तसेच दुधाळ जनावरांच्या दुधाने प्रसार होतो.
घटसर्प रोगाची लक्षणे:जनावरांमध्ये 105 पेक्षा अधिक तीव्रता डोळे लाल व सुजलेली नाक तसेच डोळे व तोंडातून स्त्राव बाहेर पडणे मान व डोके तसेच पायांना सूज श्वास घेताना त्रास व पुटपुटण्याचा आवाज श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून जनावरांचा मृत्यू होतो.“जिल्ह्याला आंत्रविषार रोग नियंत्रणासाठी तर घटसर्प रोग नियंत्रणासाठी लस मात्र प्राप्त झालेले आहेत लसीकरणाला प्रारंभ झालेला असून पशुपालकांनी लगतच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून आपल्या मौल्यवान पशुधनास लसीकरण करून घ्यावे.”असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी पुजारी यांनी केले आहे.
0 Comments