Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी परिसरात खरीप पेरणीस प्रारंभ, सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल

चिवरी परिसरात खरीप पेरणीस प्रारंभ, सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल 

चिवरी/ राजगुरू साखरे:  तुळजापूर तालुक्यातील चिवरी, येवती, आरळी उमरगा चिवरी, चिंचोली आदी परिसरात मागील आठवड्यापासून वरूणराजाचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आता खरिप पेरणींना वेग दिला आहे . मागील एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाच्या  येण्याने शेतकरी वर्गामध्ये मात्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. यंदा हवामान खात्याने मान्सून वेळेवर दाखल होईल अशी भाकीत केले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे मे महिन्यामध्ये आटोपून घेतली होती, मात्र मान्सून वेळेवर दाखल झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एक महिना पावसाची चातकासारखी वाट पहावी लागली , जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी बांधव पेरणी करण्यासाठी सज्ज झाला आहे. परिसरामध्ये सोयाबीन ,उडीद ,मुग, तुर आदी पिकांची लागवड केली जाते, मागील चार-पाच वर्षांपासून परिसरात सोयाबीन लागवडीकडे  सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल वाढला आहे .

Post a Comment

0 Comments