Hot Posts

6/recent/ticker-posts

भरधाव ट्रकच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभे असलेला इसम ठार,तुळजापूर - सोलापूर रोडवरील घटना

भरधाव ट्रकच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभे असलेला इसम ठार,तुळजापूर - सोलापूर रोडवरील घटना


तुळजापूर  : रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या इसमास भरदार ट्रकने जोराची धडक दिल्याने इसम गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की राजेंद्र नागेंद्र गिरी, वय 53 वर्षे, रा. सांगवी मार्डी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि.15.07.2023 रोजी 19.30  वा. सु सोलापूर ते तुळजापूर जाणारे एनएच52 रोडवर पाण्याच्या टाकीजवळ सांगवी मार्डी येथे उभे असताना ट्रक क्र एमएच 26 बीई 7611 चाचालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही अतिघाई व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवून क्लिनर साईडने राजेंद्र गिरी यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात राजेंद्र गिरी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- अंगद राजेंद्र गिरी, वय 32 वर्षे, यांनी दि.17.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments