मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांच्या सोबत माजी सैनिकांची बैठक संपन्न
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
धाराशिव: रविवार दि. 2 जुलै 2023 रोजी हैद्राबाद येथील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बंगल्यावर महाराष्ट्रातील प्रमुख माजी सैनीकांची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या , गरीबी , बेरोजगारी , पाणी , विज आदि विषयावर सविस्तर चर्चा माजी सैनिका सोबत केली.
महाराष्ट्रातील शेतकरी व जनतेवर मोठे संकट आले आसून येणाऱ्या काळात जवान व किसान मिळून महाराष्ट्रत काम करण्याची गरज आहे . असे त्यांनी सांगितले या .वेळी सैनिकांच्या विविध अडचणी व समस्या यावर चर्चा करण्यात आली . व लवकरच महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाची सैनिक आगाडी स्थापण करुण महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व संकटावर शेतकरी व जवान पूर्ण ताकतीने काम करतील व महाराष्ट्रातील जनतेला भारत राष्ट्र समिती पार्टीच्या वतीने न्याय मिळवून देण्याच काम करतील आसा त्यांनी विश्वास व्यक्ता केला .सैनिकांचा सन्मान म्हणून त्यांनी त्यांच्या घरी खास जेवनाची मेजवानी दिली व त्यांनी स्वतः सैनिकां सोबत दुपारचे भोजन घेतले, तसेच सैनिक आपली संपूर्ण जवानीचा कार्यकाळ देशासाठी घालवतात, देश सेवा करताना सैनिक कोणतीही तडजोड करत नाहीत, त्यामुळे देशाची सेवा केलेल्या सैनिकांनी राजकारणात आल्यास भारतासाठी उज्वल भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्या सोबत झालेल्या बैठकिस मा .आ .शंकर आण्णा धोंडगे .,बी आर एस पार्टीचे धाराशिव जिल्हा समन्वयक रामजीवन बोंदर (माजी सैनिक ) तसेच विविध जिल्ह्यांतील माजी सैनिक उपस्थितीत होते .
भारत राष्ट्र समिती पक्षाने दोन ते तीन महिन्यातच महाराष्ट्रात आपल्या पक्षाची प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवल्यामुळे जनतेतूनही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
0 Comments