Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा पोलीस मुख्यालयात पारधी समाजातील युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन उपक्रम.

जिल्हा पोलीस मुख्यालयात पारधी समाजातील युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन उपक्रम.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

उस्मानाबाद: मा. जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद येथील अंलकार हॉल येथे दि,१ रोजी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पारधी समाज बांधवाचा मोठा प्रतिसाद मिळाला. पारधी  समाजातील गरीब, गरजु व सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतीनां कौशल्यभिमुख रोजगार मिळवण्यासाठी  व या समाजात अनेक युवक युवती  सुशिक्षीत असले तरी नोकरी, व्यवसायाच्या माहिती अभावी ते रोजगारापासून वंचित आहेत. तसेच  ही बाब लक्षात घेऊन  मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी आदिवासी पारधी समाज शिक्षण, शासनाच्या विविध योजनापासून ते वंचित आहे. या समाजातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शासकिय योजनांचा लाभ, त्याचबरोबर शिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरी व्यवसायाच्या संधी  मिळाव्यात  यासाठी  मा. जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या वतीने आय सी आय सी फाउंडेशन व  आय सी आय सी आय ॲकॅडमी फॉर स्कील उस्मानाबाद व एस बी आय बॅक यांनी  ईलेक्ट्रॉनिक  इतर विविध मोफत कोर्ससेस संबंधीत, व महिला साठी  बियुटी  पार्लर  व  इतर कोर्ससेस संबंधीत तसेच महारष्ट्र ग्रामीण जिवन उन्नती अभियान, उमेद अभियान योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला बचत गट चालु करुन देणे. बचत गटामध्ये काही व्यवसाय असतील त्याची माहिती त्यांना देवून त्यांची नाव नोंदणी करुन घेण्यात आली.  पारधी समाजातील सुशिक्षीत व रोजगार इच्छुक युवकांनी शासनाच्या योजना, रोजगार व प्रशिक्षणाच्या माहितीसाठी नजीकच्या पोलीस ठाणे किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहान मा. जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  यांनी केले.


           सदर कार्यक्रमास मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद , अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. यशवंत जाधव, पोलीस निर्रीक्षक श्री. पारेकर आनंदनगर, महाराष्‌टर राज्य ग्रामीण जिवन उन्नती अभियानचे  तालुका व्यवस्थापक श्री. अभिजीत पडवळ, प्रभाग समन्वयक वडगांव,श्रीराम भोसले, प्रभाग समन्वयक, जेवळी अविनाश चव्हाण, प्रभाग समन्वयक,बेंबळी अमोल खवले, आय सी आय सी फाउंडेशन व  आय सी आय सी आय ॲकॅडमी फॉर स्कीलचे ऋषीकेश काटे, प्रशांत भोई, उमेद अभियानचे- पदमीन पवार, उस्मानाबाद  पोलीस अधीक्षक कार्यालय येथील अधिकारी अंमलदार व  पारधी समाजातील एकुण 100 ते 150 व्यक्ती उपस्थितीत  होते.


Post a Comment

0 Comments