Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस येथे कृषि दिन व कृषि संजीवनी सप्ताहाची शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत सांगता

माळशिरस येथे  कृषि दिन व कृषि संजीवनी  सप्ताहाची शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत सांगता  


नातेपुते प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात व आतराष्ट्रीय पौवटीक तृणधान्य वर्षात महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी माळशिरस अधिनस्त ११६ गावामध्ये सर्व ४३ कृषि सहायक यांनी मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक यांचे सहकार्य व उपस्थितीत दिनांक २५ जून व २ ८ जून रोजी सजातील गावामध्ये प्रमुख पिके यांचे वाण निवड, बीज प्रक्रिया, वेळेवर पेरणी, दोन चाडे बियाणे खते पेरणी, मुलस्थानी जलसंधारण , माती परिक्षणावर आधारित खत नियोजन, १०% राखत बचत उपाय , IPM, I NM , सरक्षीत पाणी , अत्पकालीन पीक नियोजन इत्यादी चे ऊस, मका, बाजरी , सोयाबीन , मुग या पीकाची उत्पादन वाढीची सुत्रे बाबत उपस्थितीत कृषि शेतकरी बाधवाना अवगत करण्यात आले .

यामध्ये बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व हुमणी अळी नियत्रण प्रकाश सापळे बसविणे प्रात्यक्षिक करून दाखविन्यात आले. २८ जून रोजी जमिन आरोग्य पत्रीका आधारीत जमिन सुपिकता निर्देशाका नुसार एकात्मिक सेद्रीय व रा. खत वापर व व्यवस्थापन बाबत जागृत करण्यात आले .

 दिनांक २६ जून रोजी अधिनस्त ८ कृषिपर्यवेक्षक यांनी मंडळ कृषि अधिकारी यांचे सहकार्याने आतंरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे निमित्त पौष्टीक तृणधान्य प्रचार , प्रसार, प्रसिद्धी व आहारातील महत्व बाबत शेतकरी बाधवाना व इतर बाधवांना माहीती देऊन तृणधान्य लागवड बाबत उत्साह व प्रोत्साहीत करण्यात आले. दिनांक ३० जून रोजी पीक काढणी प्रश्चात व्यवस्थापन प्रक्रिया व मुल्यवर्धन चे महत्व विषद करण्यात आले. दिनांक २७ जून रोजी अधिनस्त पिलिव व नातेपुते मंडळ कृषि अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात महिला स्वयसहायता गट, महीला गट संस्था कंपनी यांचे मेळावा आयोजीत करून कृषि क्षेत्रात महिलाचा सहभाग , कृषि विभाग योजना ची महिती देऊन उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा यशोचित सन्मान करण्यात आला .

 दिनांक २९ जून रोजी कृषि क्षेत्रातील आव्हाणे , अडचणी ' भावी दिशा मध्ये मनुष्यबळ ऊर्जा , प्रक्रिया, विपनन यावर कृषियांत्रीकीकरण, सौर ऊर्जा , प्रक्रिया उदयोग, मुल्यवर्धन , C RA तंत्रज्ञान, पीक विमा गटशेती बाबत महितीदेऊन मार्गदर्शन करण्यात आले . 

१ जुलै रोजी कृषि संजीवनी सप्ताह सांगता व डॉ. अँड मा वसंतराव नाईक यांची जयंती कृषि विभाग सर्व अधिकारी , कर्मचारी शेतकरी , पत्रकार यांचे उपस्थितीत पं. समिती सभागृह येथे  तानाजीराव इंगवले देशमुख प्रगतशील शेतीनिष्ठ, पीक स्पर्धा विजेते यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहूणे सौ शोभा वाघमोडे  विलास भोसले कृषि पत्रकार व  रणजीत सुळ प्रगतशील शेतकरी यांचे उपस्थितीत प्रतिमापुजन व फळाचा राजा आंबा रोपट्या ला पाणी देऊन करण्यात आले .

 १ जूलै कृषि दिन औचित्य साधून कृषि विभाग योजना ,तंत्रज्ञान , यशोगाथा प्राधान्यक्रमाने प्रचार प्रसार व प्रसिद्धी साठी मोलाचे कार्य करत असलेल्या सौ शोभा वाघमोडे व श्री विलास भोसले या पत्रकार बंधूचा मान्यवराचे हस्ते गुलाब पुष्प व प्रशस्ती / प्रमाणपत्रसह यशोचीत सन्मान करण्यात आला. कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी समाधानकारक उल्लेखणीय काम केलेल्या श्री लालासाहेब माने,  भागवत शिंदे, व कु. तृप्ती पवार या कृषिसहायक व  गोरख पांढरे कृप यांचा मान्यवराचे हस्ते गुलाब प्रष्पासह प्रमाणपत्र देऊन यशोचीत सन्मान करून इतर अधिकारी व कर्मचारी यांचे मध्ये उत्साहाचे प्रोत्साहनच वातावरण निर्माण करून संधी उपलब्ध करून देण्यात आली . 

खरिप हंगाम 2022-23 मध्ये बाजरी पीक स्पर्धा मध्ये तालुकास्तर प्रथम क्रमाक श्री जोतीराम गोरे, द्वितीय क्रमांक बाळू शिरमिरे व तृतीय क्रमांक  दशरथ पानसकर ज्वारी पीक स्पर्धा मध्ये प्रथम क्रमाक पांडूरंग माने ,द्वितीय क्रमांक  कैलास फणसे व तृतीय क्रमांक सौ अरुणा सुळ आणि मका पीक स्पर्धा प्रथम क्रमांक महादेव शिंगटे द्वितीय क्रमांक  तानाजीराव इंगोले देशमुख व तृतीय क्रमांक सौ अनुसया लोखंडे या लाभार्थीना गुलाब पुष्प व प्रमाणपत देऊन मान्यवराचे हस्ते यशोचित सन्मान करण्यात आला व त्याचे पीक उत्पादनवाढीचे तंत्र त्यांचे सोप्या भाषेत विशद करण्यात आले . कृषि दिन व कृषि संजीवनी सप्ताह ची सांगता सर्व अधिकारी कर्मचारी , पीक स्पर्धा विजेते कृषि पत्रकार यांचे शुभहस्ते प. समिती प्रागंनात फळाचा राजा आंबा पिकाचे वृक्षारोपन करण्यात आले . 

कार्यक्रम आयोजनात व प्रस्तावन साठी श्री सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी माळशिरस , नियोजनासाठी श्री चव्हाण, श्री सरवदे  सुळ या पःस कृषि अधिकारी ,सुत्रसंचालनासाठी  भागवत शिंदे व आभार प्रदर्शनास  अनिल फडतरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments