व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे मुख्यमंत्री व महासंचालकांना निवेदन
धाराशिव : दिनांक 3 , शासकीय जाहिरात वितरणात छोट्या वृत्तपत्रावर अन्याय होत असून, महाराष्ट्र शासनाच्या वर्षपूर्ती ची जाहिरात साप्ताहिकांना जाणून बुजून वगळण्यात आल्यामुळे उस्मानाबाद येथील साप्ताहिक वृत्तपत्र च्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी धाराशिव यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, व महासंचालक साहेब माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या सर्व निर्णयाची प्रसिद्धी साप्ताहिक वृत्तपत्र सातत्याने करत असून, ग्रामीण भागातल्या समस्यांचे वार्तांकन हे छोटी वृत्तपत्रे करीत असतात.
मात्र ज्या ज्या वेळी प्रदर्शनी जाहिरात शासनाच्या माध्यमातून देण्यात येते त्या वेळी साप्ताहिक वृत्तपत्राला कायम डावलण्यात येते अथवा जाहिरातीचा आकार एकदम कमी करून साप्ताहिक वृत्तपत्रांची बोळवण केली जाते. हि अतिशय दुर्देवी बाब आहे. असे मत महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्र संपादकांचे झालेले आहे. वृत्तपत्र हे स्वातंत्र्य चळवळीपासून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहून सामाजिक परिवर्तनाचे काम सक्षमपणे करत आलेले आहे. मात्र आजच्या डिजिटल युगात साप्ताहिक वृत्तपत्र चालविणे जिकरीचे झालेले आहे.
शासन जीआर प्रमाणे प्रत्येक दैनिकांसोबत प्रत्येक साप्ताहिकाला जाहिरात देण्याच्या नियमाला धरून आमची हक्काची जाहिरात द्यावे अशी विनंती सदर निवेदनात करण्यात आलेली आहे.
या प्रसंगी व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा (साप्ताहिक तेरनेचा छावा या वृत्तपत्राचे संपादक पांडुरंग मते ,)कार्याध्यक्ष राजेश बिराजदार (संपादक साप्ताहिक धाराशिवार्ता) जफर रब्बानी शेख उपाध्यक्ष (संपादक साप्ताहिक युवा मशाल) श्रीकृष्ण विष्णू लोमटे (संपादक साप्ताहिक संत गोरोबाकाका समाचार) महेबूब दस्तगीर पठाण (संपादक साप्ताहिक उमरगा टाइम्स )राजकुमार गजेंद्र गंगावणे (संपादक साप्ताहिक वृत्तदर्शन) ज्योतीराम दत्तात्रेय निमसे (संपादक साप्ताहिक रेणू संदेश) आदींच्या स्वाक्षरीने जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
0 Comments