तुळजापूर तालुक्यातील भिज पावसामुळे खरीप पिकांना दिलासा, मोठ्या पावसाची बळीराजाला प्रतीक्षा
तुळजापूर / राजगुरू साखरे : तुळजापूर तालुका परिसरामध्ये यंदा पावसाने आगमन उशिरा झाल्यामुळे पेरणी सुद्धा उशिरा झाली, असली तरी मागील चार-पाच दिवसापासून सुरू असलेल्या भिज पावसाच्या सरींनी शेत शिवार नाहून निघाले असून खरिपातील कोवळ्या पिकांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षी पावसाचे आगमन तब्बल एक महिना उशिरा झाल्यामुळे जून महिन्यात होणारी पेरणी तब्बल एक महिना उशिराने झाली आहे. यावेळी चालू महिन्यातील तुळजापूर तालुका परिसरात शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. मात्र पाच जुलै रोजी पडलेल्या पावसानंतर काही दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र मागील आठवड्यापासून रिमझिम भिज पावसाने सुरुवात केली असून याचा फायदा खरिपातील कोवळ्या पिकांना होत आहे. एकंदरीत पाऊस उशिरा झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उशिरा केली तरी या भिज पावसामुळे शेतशिवारात हिरवळ डोकावून नैसर्गिक वातावरण नटल्याचे दिसून येत आहे.
0 Comments