Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग -अक्कलकोट राज्य महामार्गा 652 रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ सुरू करा शेतकरी शेख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नळदुर्ग -अक्कलकोट राज्य महामार्गा 652 रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ सुरू करा शेतकरी शेख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव


धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग - अक्कलकोट राज्य महामार्ग 652 नळदुर्ग हद्दीतील अर्धवट असलेले काम तात्काळ सुरू करा या मागणीसाठी शेतकरी अब्दुल गणी शेख यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदृग हद्दीतील गाव नकाशा प्रमाणे अर्धवट असलेला रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा. नळदुर्ग अक्कलकोट रस्त्यावर दैनंदिन व्यवहारासाठी व शाळकरी विद्यार्थी, भाविक, व्यापारी वयो वृद्ध ,गर्भवती महिला, शेतकरी व इतर रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, या रस्त्याचे अर्धवट असलेले काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.

गाव नकाशा मध्ये नळदुर्ग  हद्दीतील रोडची लांबी व रुंदी आहे याप्रमाणे तात्काळ अर्धवट राहिलेली काम  पूर्ण करण्यात येईल याची प्रशासन दखल घ्यावी, अन्यथा नळदुर्ग हद्दीतील शेतकऱ्यांच्या वतीने उपोषण करण्यात येईल असे शेतकरी अब्दुल गणी शेख यांन  निवेदनामध्ये नमूद केले आहे,सदर निवेदनाची प्रत रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी , मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , पोलीस अधीक्षक उस्मानाबाद याना निवेदन देण्यात आले आहे .



Post a Comment

0 Comments