Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रीपतराव भोसले जूनियर कॉलेजतर्फे जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरी

श्रीपतराव भोसले जूनियर कॉलेजतर्फे जिल्हा कारागृहात रक्षाबंधन साजरी

धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेमधील स्वयंसेविकांनी उस्मानाबाद कारागृहातील कैद्यांना राख्या बांधून सामाजिक सलोखा राखला. हा कार्यक्रम जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी काही स्वयंसेविकांनी कैद्यांना राख्या बांधून मनोगताच्या रूपाने आपल्या सद्भावना व्यक्त केल्या. या  कार्यक्रमासाठी कला व वाणिज्य विभाग प्रमुख श्री. एन. आर. नन्नवरे  सर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री. एस. व्ही. पाटील सर, सहकार्यक्रमाधिकारी सौ. जाधव मॅडम, प्रा. श्री. गोरे सर आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर व उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments