Hot Posts

6/recent/ticker-posts

शासकिय कामात अडथळा तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शासकिय कामात अडथळा तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापुर: येथील भुमिअभिलेख कार्यालयामध्ये दि, २२ रोजी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी, तुळजापूर पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, येथील गणेश नगर, जुना औसा रोड ता. जि. लातुर येथील- संजय गणपतराव माने, वय 54 वर्षे, मुख्‌यालय सहाय्यक उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय तुळजापूर हे दि22.08.2023 रोजी 15.00 वा. सु. उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे शासकीय कर्तव्य पार पाडत होते. दरम्यान  आरोपी नामे- खंडु शिंदे रा जळकोट व आनोळखी तीन यांनी शेत जमीण मोजणी प्रकरणाचे काय झाले असे म्हणून संजय माने यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून शासकिय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केला. यावरुन संजय माने यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments