Hot Posts

6/recent/ticker-posts

दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी ॲड.मुकेश शिंदे तर जिल्हा सहसंघटक पदावर इंजि.पृथ्वीराज देडे यांची नियुक्ती

दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस  या  संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी ॲड.मुकेश शिंदे तर जिल्हा सहसंघटक पदावर इंजि.पृथ्वीराज देडे यांची नियुक्ती

धाराशिव   :( प्रतिनिधी ) दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव अॅड डॉ केवलजी ऊके , राज्य सचिव वैभवजी गिते  यांच्या मार्गदर्शनाखाली संघटणेची उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीत संघटणेचे राज्य महासचिव अॅड डॉ केवलजी ऊके , राज्य सचिव वैभवजी गिते यांच्या आदेशाने उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा पदावर निवडी जाहीर करुन नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या निवडीमध्ये सर्व जाती धर्मासह वंचित, घटकातील दलीत समाजाच्या उन्नतीसाठी व दलीतांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पायबंद व आळा घालुन अत्याचार विरोधी बंड पुकारुन काम करणारे व गरजुंना सर्वप्रकारे सतत मदतीचा हात देणारे उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. मुकेशजी शिंदे व पृथ्वीराज देडे यांनी मागील काळात केलेल्या कार्याची एन डी एम जे संघटणेच्या वरीष्ठ पदाधिकारी यांनी दखल घेऊन मुकेशजी शिंदे यांची नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटणेच्या उस्मानाबाद जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी तर इंजि. पृथ्वीराज देडे यांची उस्मानाबाद जिल्हा सहसंघटक पदावर नियुक्ती करुन उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत व जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी झोंबाडे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संघटणेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, जवळा नि येथील माजी सरपंच नवजीवन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोरे, ॲड.बाळासाहेब भोरे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर मंडळी उपस्थित होते. अॅड. मुकेशजी शिंदे, पृथ्वीराज देडे या दोन्ही पदाधिकारी यांची संघटणेच्या पदावर जिल्हा पदांवर निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments