/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> नळदुर्ग किल्ल्यावरील आत्महत्येचा प्रकरण उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू, मृतांचा आकडा चार-Ashwini Paul Death Case

Hot Posts

नळदुर्ग किल्ल्यावरील आत्महत्येचा प्रकरण उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू, मृतांचा आकडा चार-Ashwini Paul Death Case

नळदुर्ग किल्ल्यावरील  आत्महत्येचा प्रकरण उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू, मृतांचा आकडा चार



धाराशिव प्रतिनिधी : नळदुर्ग किल्ल्यातील उपली बुरुजावरून राष्ट्रीय कुस्तीपटू असलेल्या अश्विनी पौळ  यांनी आपल्या तीन चिमुकल्यांसह उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण धाराशिव जिल्हा हादरला आहे.

या घटनेत अश्विनी पौळ  आणि त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री गंभीर जखमी क्रांती या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी दुपारी चारच्या सुमारास अडीच वर्षाच्या वीरा नावाच्या मुलीनेही  प्राण सोडला. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे.

वीरा गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र शनिवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.

 या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या धक्कादायक घटनेप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नळदुर्ग किल्ला आत्महत्या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>