धाराशिव : फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण.
धाराशिव:आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित, फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल धाराशिव येथे दि,५ आज रोजी 'एक मूल एक झाड' या उपकरणाद्वारे वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्गाच्या सान्निध्यात नयनरम्य - अल्हाददायक वातावरणात पार पडला असून, प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी यांनी वृक्षांचे महत्व व 'वृक्षारोपण व निरोगी आरोग्य, वन्यजीव व पक्षी यांतील बंध, वाढती जनसंख्या व त्यामुळे वाढते औद्योगिकीकरण यामुळे होणारे परिणाम यावर आळा घालण्यासाठी वृक्ष का महत्वाचे? अश्या अनेक विषयावर व्याख्यान दिले व स्वतः प्राचार्य व सर्व सहशिक्षक - शिक्षिका यांनी सर्व विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
0 Comments