Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र तरुणांनी अभ्यासणे काळाची गरज - प्रोफे डॉ वाय ए डोके

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र तरुणांनी अभ्यासणे काळाची गरज - प्रोफे डॉ वाय ए डोके

प्रतिनिधी रुपेश डोलारे  उस्मानाबाद


तुळजापुर: येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रोफेसर मेजर डॉ यशवंत डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले, आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात लाल बाल पाल यांच्या पैकी एक लोकमान्य टिळक होय,त्यांनी भारतीय जनतेस देशाभिमान काय असतो याची शिकवण दिली , गणेश उत्सवासारख्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण केला तर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून सर्वसामान्य माणसाला एक उर्जा प्रदान केली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा पोवाड्याच्या माध्यमातून देशाच्या बाहेर जाऊन प्रचार केला, फक्त दिड दिवसाच्या शाळेत जाणारा एक विद्यार्थी मराठी साहित्य विश्वात साहित्य रत्न ठरला ही प्रेरणादायी बाब आहे असे‌ अनमोल विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एम आर आडे केले तर आभार प्रा व्ही एच चव्हाण यांनी मानले,सदर प्रसंगी डॉ बालाजी गुंड, ग्रंथपाल दिपक निकाळजे, डॉ नेताजी काळे, डॉ सी आर दापके, डॉ एफ एम तांबोळी, डॉ एस एस दैठणकर ,प्रा आशपाक आतार यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments