पुणे येथे बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय विचार मंथन बैठक संपन्न
प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव
पुणे : बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी पुणे येथे विचार मंथन बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राज्य भरातून सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक कार्यकत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गेली तीन-चार वर्षापासून सातत्याने मातंग समाजाच्या प्रश्नावर उत्तरही सामाजिक प्रश्नावर रमेश तात्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणारे रमेश तात्या गालफाडे हे बहुजन रयत परिषदेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.
प्रत्येक गाव खेड्यातील तळागाळातील कार्यकर्ते जोडून महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करण्याचे काम रमेश तात्या गालफाडे यांनी केले,काळात होणाऱ्या सर्व निवडणुका निर्माण करण्याचे काम रमेश तात्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण गालफडे यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने कार्यकत्यांना व्यासपीठ परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी कार्यकर्त्यांना संघटने अंतर्गत आपले मत मांडता यावे यासाठी प्रथमच स्टेज निर्माण करून देण्याचे काम रमेश तात्या गालफाडे यांनी केले, महाराष्ट्र बहुजन रयत परिषदेच्या प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभा राहणार आहोत यापुढे येणाऱ्या आगामी निवडणुका देखील लढवणार आहोत ज्या ठिकाणी बहुजन परिषदेची बांधणी झालेली नाही अशा ठिकाणी बांधणी करण्याचे काम स्वतः मी येऊन करणार आहे, येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण लढणार असल्याचे मत बहुजन परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी बोलताना व्यक्त केले .
यावेळी,भाई मोहन गुंड, बहुजन बहुजन रयत परिषदेचे नेते सूर्यकांत भालेराव,धनंजय जाधव,तेलंग अबा,शंकर तडाखे,हे उपस्थित होते, व यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सर्व कार्यकर्त्यांच्या मनोगतातून संघटने विषयी असलेली मनातील खदखद निघाली बाहेर, अनेक कार्यकर्ते नाराज, बहुजन रयत परिषदेची निष्ठा सोडणार नसल्याची प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी ग्वाही दिली.
0 Comments