Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवतीने तालुक्यातील शहापूर जळकोट व नळदुर्ग या मंडळांना विमा देण्यात यावा तहसीलदार यांना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुळजापुरवतीने तालुक्यातील शहापूर जळकोट व नळदुर्ग या मंडळांना विमा देण्यात यावा तहसीलदार यांना निवेदन 

प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव 

तुळजापुर : तालुक्यामध्ये यंदा सुरुवातीपासूनच पावसाचे अत्यंत प्रमाण कमी  होते, जुलै महिन्यामध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी कशीबश्या पेरण्या उरकून घेतल्या,माञ मागील एक महिन्यापासुन तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीपातील पिके करपुन जात आहेत माञ  कोणत्याही मंडळात पाऊस झालेला नसताना अधिकारी वर्गाने चुकीचा पंचनामा करून तालुक्यातील शहापूर जळकोट व नळदुर्ग या मंडळ विभागात पुरेसा पाऊस झालेला आहे असे खोटे दाखवून चुकीचा पंचनामा केला आहे तसेच सदर मंडळातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही खूपच बिकट आहे पाऊस नसल्याकारणाने मंडळातील शेतकऱ्यांना अनेक संकटना तोंड द्यावे लागत आहे  तरी माननीय राज्यपाल साहेबांनी सदर मंडळातील शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी महारष्ट्र सरकार ला आदेशित करावे  या आशयाचे निवेदन माननीय राज्यपाल साहेब यांना जिल्हाधिकारी मार्फत श्री तुळजापूर तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक विभाग धनंजय पाटील युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे तालुका अध्यक्ष संदीप गंगणे कार्याध्यक्ष शरद जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक शेख गणेश नन्नवरे शहाजी कसबे नाना सूरडे  अनिल कदम आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments