मालिकेतून उलगडणार सिंधूताईंचा जीवनपट - माई परिवार सदस्य अनिल आगलावे
तुळजापुर - अनाथ लेकरांच्या आई बनलेल्या पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर सिंधूताई माझी माई - गोष्ट चिंधीची या मालिकेतून उलगडणार आहे.
अनाथ लेकरांच्या आई बनलेल्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा येत्या १५ ऑगस्टपासून संध्याकाळी ७ वाजता 'कलर्स मराठी'वर 'सिंधूताई माझी माई - गोष्ट चिंधीची' या मालिकेतून उलगडणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना सिंधूताईंच्यावरील चरित्रकथा बघायला मिळणार आहे. ही मालिका सर्वांनी पहावी असे आवाहन ममता सिंधूताई सपकाळ यांनी यावेळी केले.
या मालिकेत सिंधूताईंच्या बालपणीची भूमिका बालकलाकार अनन्या टेकवडे साकारणार आहे. अनन्याशिवाय या मालिकेत,प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, बिग बॉस फेम किरण माने,अभिनेत्री योगिनी चौक, अभिजित झाडे,आनंद भुरचंडी,शर्वरी पेठकर हे कलाकार मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
0 Comments