धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांती दिनाचे औचित्य साधून "७५ वां आझादी का अमृत महोत्सव" अंतर्गत भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रिडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने 'मेरी माटी मेरा देश' हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने ७५ रोपांचे वृक्षारोपन करणे, भूमातेला नमन व वीरांना वंदन करणे आणि पंचप्रण शपथ घेणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर पोपट रामचंद्र गोटे लाभले. निवृत्त मेजर हनुमंत कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. एस. बी. कोळी सर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमात माननीय गोटे यांनी तरुणांनी देशसेवेसाठी सैन्यामध्ये भरती होणं गरजेचं आहे यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच माननीय कवडे यांनी देशासाठी तरुणांनी निर्व्यसनी राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी कला व वाणिज्य शाखेतील प्रा. एम. पी. काळे सर, प्रा. कोरके के. के. सर, प्रा. गोरे सर, प्रा. मोहिते सर, प्रा.पाटील सर, प्रा. भोसले सर, प्रा. लोमटे ए. ए. सर, प्रा. खुने सर, प्रा. शिंदे सर, प्रा. बी. एस. नन्नवरे सर, प्रा. सौ. जाधव मॅडम, प्रा. सौ. वाडकर मॅडम, प्रा. सौ. शेळके मॅडम आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. श्री. घोडके सर यांनी केले तर आभार श्री. पाटील सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. संतोष घार्गे सर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले.
0 Comments