धाराशिव शहरानजीक जाणाऱ्या सोलापूर-धुळे महामार्गालगत सर्विस रोड व विद्युतीकरणासाठी 80 कोटी रुपये मंजूर – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्यास यश
धाराशिव: जिल्हयातून जाणाऱ्या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गा क्र. 211 लगत सर्विस रोड व उड्डाण पुलावरील विद्युती करणासाठी मा.खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वारंवार पत्र व्यवहाराद्वारे पाठपुरावा केला होता. सदर महामार्गलगत सर्विस रोड नसल्याकारणाने वाहतुक करताना वाहन धारकास व नागरिकांस अनेक अडचणींचा सामना करत लागत होता तसेच उड्डान पुलावरती प्रकाश योजना नसल्याकारणाने अपघाताचे प्रमाण वाढत होते. या अनुषंगाने दि. 05/10/2021 रोजी शासकिय विश्रामगृह, शिंगोली जि.धाराशिव येथे प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्रांधिकरण, सोलापूर यांच्या सोबत आढावा बैठक घेतली त्यानंतर दि. 13/06/2022 दिशा समितीच्या बैठकीमध्ये शहरातील उर्वरित 7.14 कि.मी लांबीचा सर्विस रोड व सध्या अस्तित्वात असलेल्या 1.08 कि.मी सर्विस रोडचे रुंदी करण व विद्युतीकरण करण्याबाबत व येडशी येथील टोल वसूली बंद करण्याबाबत प्रकल्प संचालक ,सोलापूर यांना सूचना दिल्या तरीही या अपूर्ण कामांमध्ये प्रगती दिसून येत नव्हती.
प्रकल्प संचालक,सोलापूर यांना सदर अपूर्ण कामांबाबतचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण,मुंबई येथे पाठविण्यास सांगून केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना 04/08/2023 रोजी दिल्ली येथे भेटून सदर महामार्गच्या अपूर्ण कामाचा प्रस्ताव मंजूर करणेबाबत विनंती करण्यात आली. त्या विनंतीच्या अनुषंगाने धाराशिव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा 211 करीता 80 कोटी (GST वजा करीता 68.41 कोटी) एवढा निधी मंजूर केल्याअसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.सदरील अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याने धाराशिव शहरवासीयांनकडून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments