Hot Posts

6/recent/ticker-posts

रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्साहात साजरा

रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्साहात साजरा
नातेपुते : भारतात सणाची प्रतीक्षा सर्व वयोगटातील लोक म्हणजेच मुले, तरुण आणि कुटुंबातील सर्वच वडिलधारे करतात. भारतातील प्रत्येक व्यक्ती भारतीय उत्सव खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात. बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे मध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.संस्कार,गुणवत्ता,शिस्त,खेळ, आणि संस्कृती या पंचसूत्री वर आधारित काम करणारी शाळा म्हणून तालुक्यात अल्पावधीत नावारूपास आलेल्या व उपक्रमशील व गुणवत्ता पूर्ण शाळा अशी आगळीवेगळी ओळख असलेल्या शाळेत सर्व भारतीय सण व उत्सव साजरे केले जातात.

बाळ गोपाळ श्रीकृष्ण जन्म निमित्ताने मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. " दहीहंडी सारखे उत्सव शाळेत साजरे केल्याने विद्यार्थ्यांमधील संघ भावना वाढीस लागते. एकमेकास मदतीची भावना निर्माण होते. व पारंपारिक सण उत्सवाची माहिती मिळते. भारतीय संस्कार व संस्कृतीची रुजवणूक होते. म्हणूनच म्हणूनच शाळेत विविध उत्सव साजरे करण्यात येतात." असे प्रतिपादन रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय श्री प्रमोद भैय्या दोशी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते  भगवान श्रीकृष्ण व व भगवान महावीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील नर्सरी ज्युनिअर केजी सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य साजर केले. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना श्री कृष्णाच्या जीवनाविषयी  प्रशालेतील शिक्षकांनी महत्त्व सांगितले. त्यानंतर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात दहीहंडी फोडण्यात आली. 


रत्नत्रय प्रि- प्रायमरी स्कूल नातेपुते व माळशिरस  मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडीचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी शाळेतील विद्यार्थी  राधा - कृष्णाच्या वेशभूषेत स्कूलमध्ये आले होते. कार्यक्रमास एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंतलाल (दादा) दोशी व तसेच मार्गदर्शिका मृणालिनी (भाभी) दोशी, रत्नत्रय प्री प्रायमरी स्कूल नातेपुतेचे सभापती वैभव (भैय्या) शहा, सदस्य अमित गांधी, प्रीतम दोशी,हितेश सावंत पाटील,नीलम मोरे मॅडम, अर्चना गटकळ,सीमा सावंत, अवघडे मॅडम, रेश्मा नारायणे, विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  दहीहंडी फोडल्यानंतर शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल (दादा) दोशी यांच्यातर्फे खाऊ वाटप झाले.याप्रसंगी सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments