Hot Posts

6/recent/ticker-posts

अभिषक पास पुजा दर वाढ कमी करणे ,टोळ भैरोबा दरवाजा उघडणे व नगर परिषद शाळांसाठी ६ कोटी निधीची मागणी बाबत मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन|

अभिषक पास पुजा दर वाढ कमी करणे ,टोळ भैरोबा दरवाजा उघडणे व नगर परिषद शाळांसाठी ६ कोटी निधीची मागणी बाबत मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर 


तुळजापुर : तुळजाभवानी मंदिरातील अभिषेक पास दरवाढ कमी करणे, टोळभैरोबा दरवाजा उघडणे व नगरपरिषद शाळांसाठी ६ कोटी निधी आदी मागण्यासाठी मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.,दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान विश्वस्त बैठकी मध्ये अभिषेक पास रु ५००/ केला आहे तो रद्द करुन पूर्वत अभिषेक पासचा दर ठेवण्यात यावा.तुळजा भवानी मंदीर परीसरातील दक्षिण बाजुस टोळ भैरोबा दरवाजा बर्‍याच वर्षा पासुन बंद आहे तो उघडण्यात यावा. नगर परिषद शाळा क्र १,२ व ३ च्या विकासा करिता श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान मार्फत ६ कोटी निधी उपलब्ध करुन देणे बाबत.

महाराष्र्टाची कुलस्वामीनी आई तुळजा भवानी मंदीर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत व साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे येथे सर्व साधारण एका दिवसात ४० ते ५०  हजार भाविक दर्शनासाठी येत असतात तर मंगळवार,शुक्रवार आणि रविवार तसेच नवरात्र काळात भाविकांची संख्या हि लाखां वरती अस्ते या शहरास ऐतिहासिक महत्व आहे. देशाच्या कानोकोपर्‍यातुन भाविक दर्शनासाठी येत असतात. तुळजा भवानी मंदीर विश्वस्त बैठकी च्या इतिवृत्तानुसार अभिषेक पास दरात रु ५००/ वाढविण्याचा ठराव पारीत केला आहे.

परंतु भाविक,पुजारी यांचे हित लक्षात घेता अभिषेक पास दरात रु ५००/ च्या ऐवजी पूर्वीचा रु ५०/ दर ठेवण्यात यावा. तसेच टोळ भैरोबा दरवाजा हा सुरक्षेच्या कारणास्तव बरेच वर्षा पासुन बंद आहे तो दरवाजा स्थानिक पुजारी,भाविकांसाठी उघडण्यात यावा. त्यामुळे भाविक भक्तांना व पुजारी बांधवांना नाहक त्रास होणार नाही.वृंद भक्त, पुजारी बांधवांना सदरील टोळ भैरोबा दरवाजा उघडल्याने मंदीरात जाण्यासाठी सोयीचे होईल.

सद्य परस्थिला नगर परिषद अंतर्गत  शाळा तिन असुन काही शाळा ISO मानांकन प्राप्त आहेत,सदरील शाळेच्या इमारती या पडीक,अपुरी जागा अशा अवस्थे मध्ये आहेत. सदरील शाळेच्या विकास कामासाठी तुळजा भवानी मंदीर संस्थान मार्फत नव्याने शाळेच्या विकास कामासाठी ६ कोटी निधी मंदीर संस्थान मार्फत देण्यात यावा.जेणे करुण शहरातील नगर परिषद शाळांचाही विकास होईल व शहर वासियांच्या दृष्टीकोणातुन एक चांगल्या प्रकारच्या शाळेची उभारणी होईल. असे निवेदनात नमूद केली आहे.

सदरील मागणीचे निवेदन मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी,नगरसेवक पंडीतराव जगदाळे,विजय कंदले,किशोर साठे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदना मार्फत दिले आहे.

Post a Comment

0 Comments