यंदा बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट, साहित्य खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा आखडता हात
![]() |
नळदुर्ग येथील आठवडी बाजारातील पोळा सणासाठी सजलेले बाजारपेठेतील दृश्य |
तुळजापुर : शेतकरी बांधवांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला येत्या गुरुवारी दि,(१४) रोजी सर्जा - राजाचा सण साजरा होत आहे .त्यामुळे या सणादिवशी बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या झुली, शिंगे रंगवण्यासाठी वारणीस, रंगीबेरंगी गोंडे, घुंगराची चंचाळे, बाशिंग ,पितळी शेंबी, मोरक्या, कासरे आदी साहित्य खरेदीसाठी बाजारात आली आहेत.
मात्र यंदा बैल पोळा सणावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. त्यामुळे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. मागील तीन महिन्यापासून तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरिपातील पिके पूर्णतः वाया गेले असून रब्बी हंगामाची सुद्धा शेतकऱ्यांना खात्री वाटत नाही. अर्धा पावसाळा संपला तरी अजूनही परिसरातील तलाव विहिरी, नाला, नद्या, ओढे यामध्ये पाणीसाठा झालेला नाही. एकंदरीत यावर्षी जलसाठा झाला नसल्यामुळे बैलांना आंघोळ कुठे घालायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा 25 ते 30 टक्के साहित्याची दर वाढल्यामुळे झाल्यामुळे बळीराजाच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. यंदा तुळजापूर तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मागील महिनाभरापासुन तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पोळा या सणासाठी अग्रीम पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी व तालुक्यातील ज्या मंडळाचा अग्रीम पिकविमात समावेश केलेला नाही अशा मंडळांचा समावेश करून घ्यावा अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे.
0 Comments