आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैल जोड्यांची संख्या घटली, केवळ हौसेपोटी सर्जा राजाची जोडी दावणीलापूर्वीच्या काळी आधुनिक तंत्रज्ञान अवगत नसल्याने प्रत्येक शेतकऱ्याकडे एक तरी बैल जोडी असायची, मात्र अलीकडच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले त्यामुळे शेतकरी बांधव या तंत्रज्ञानाचा वापर करू लागला. यामुळे बैलजोड्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. बैलजोडीच्या सहाय्याने सर्व शेतीची मशागती करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज राहायचा मात्र आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे यामुळे कमी कालावधीमध्ये जास्त काम होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल ही ट्रॅक्टर वापरण्याकडे जास्त आहे. पूर्वीच्या काळी बैलपोळा म्हटले की आठवडाभरापासूनच शेतकरी लगबग करताना दिसत होता, बैलाला लागणाऱ्या मोरक्या, घंटी गुफंणे , नवीन वेसन आधी लागणाऱ्या साहित्याची तयारी करून ठेवत असे, बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आंघोळ घालून सायंकाळच्या वेळेस खांदे मळणी करून पूजा केली जायची, दुसऱ्या दिवशी म्हणजे मुख्य पोळ्याच्या दिवशी बैलाचे शिंगे रंगून, पाठीवर झूल, शिंगांना फुगे, गळ्यामध्ये घागरमाळा ,शिंगांमध्ये शेंब्या, आधी साज सजून बैलांची गावातून थाटामाटात मिरवणूक काढली जाते सायंकाळी मालकाकडून बैलांना गोडधोड नैवेद्य दाखविला जातो.
आता मात्र आधुनिक तंत्रज्ञान आल्याने बैलांची संख्या कमालीची घटते आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्जा राजाची जोडी केवळ हौसेपोटी दावणीला असल्याचे दिसून येत आहे, धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या दारी एकेकाळी घरोघरी बैलजोडी दिसायची, याच बैलजोडीच्या मदतीने शेतीतील सर्व कामे केली जायची. पण अलीकडच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाले त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान सोयीस्कर वाटू लागले त्यामुळे बैल जोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली , त्यामुळे गावोगावी बैल जोड्या कमी आणि ट्रॅक्टर जास्त असल्याचे पहावयास मिळत आहे, काही काही ठिकाणी तर बैल पोळ्या ऐवजी ट्रॅक्टर ला सजून गावभर मिरवणूक काढत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बैलांची संख्या घटत झाली असून बैलांची संख्या घटत चालली असून त्यामुळे बोटावर मोजण्या इतकीच बैलजोड्या शेतकऱ्याकडे शिल्लक असल्याचे पहावयास मिळत आहे.
बैल जोड्यांची संख्या निम्म्याने घटली
पूर्वीच्या काळी आधुनिक तंत्रज्ञान अवगत नसल्याने दारोदार बैल जोडी पाहायला मिळायची, पण अलीकडच्या काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आणि मशागतीची कामे जलद होऊ लागली त्यामुळे शेतकऱ्यांना बैल जोडी सांभाळणं अवघड वाटू लागलं आणि आधुनिक सामग्रीचा वापर करू लागले. त्यामुळे दिवसेंदिवस बैलांच्या संख्या घटत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्जा राजाची जोडी आता केवळ हौसेपोटी शेतकऱ्याच्या दावणीला दिसून येत आहे, सात वर्षांमध्ये बैलरण्यांची संख्यां निम्म्याने घटली आहे, सन 2012 च्या पशु जनगणनेनुसार 40 हजार 367 बैलांची संख्या होती तर 2019 च्या पशु जनगणनेनुसार 21 हजार 527 एवढी झाली म्हणजे सात वर्षात निम्म्याने बैलांची संख्या घटली आहे. तर नव्याने पशु जनगणना झाल्यास हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
0 Comments