दुचाकी अपघातात सांगवी मार्डी येथील युवक ठार, अन्य दोघे जखमी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे :तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील युवक वैभव भिमराव सर्वगोड हे धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते गावाकडे परत येताना त्यांचा सिंदफळ गावाजवळील उड्डाण पुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये वैभव सर्व गोड यांचा जागीच मृत्यू झाला याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की आरोपी नामे- विशाल तानाजी कांबळे, रा. सांगवी मार्डी, ता. तुळजापूर व सोबत मयत नामे-वैभव भिमराव सर्वगोड, वय 20 रा. सांगवी मार्डी ता. तुळजापूर जि. धाराशिव, राजु उर्फ ऋतुराज बाळासाहेब सुरते, हे दि.01.08.2025 रोजी 20.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25बी बी 9033 ही वरुन जात होते. दरम्यान तुळजापूर ते सोलापूर रस्त्यावर सिंदफळ गावाचे उड्डान पुलाचे उतारावर आरोपी नामे- विशाल कांबळे यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून कुत्रा आडवा आल्याने मोटरसायकलचे ब्रेक दाबल्याने मोटरसायकल स्लीप होवून वैभव सर्वगोड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर आरोपी विशाल कांबळे व राजु उर्फ ऋतुराज सुरते हे दोघे जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विकी भिमराव सर्वगोड, वय 23 रा. सांगवी मार्डी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106, 125(अ), 125(ब) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
![]() |
मयत वैभव सर्वगोड |
0 Comments