Hot Posts

6/recent/ticker-posts

बसवंतवाडी शिवारात म्हशी चारण्याच्या कारणावरून एकास मारहाण, नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

बसवंतवाडी शिवारात म्हशी चारण्याच्या कारणावरून एकास मारहाण, नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल 

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील बसंतवाडी शिवारातील ओढ्यामध्ये म्हशी  चरण्याच्या कारणावरून दोघांनी एकाच मारहाण केली ही घटना २१ सप्टेंबर घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की वसंतवाडी शिवारामध्ये सागर पारवे हे थांबले होते,यावेळी गावातील ज्ञानदेव पारवे, सिद्राम पारवे या दोघांनी तेथे येऊन तु आमच्या वड्यामध्ये म्हशी का चारल्या असे म्हणत सागर पारवे यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्कया,काठीने , कत्तीने  वार करून जखमी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सागर पारवे यांनी २१सप्टेंबर नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये संबंधित दोघांविरुद्ध फिर्याद दिली , त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments