बाभळगाव शिवारात बैलजोडी सह एक गाय चोरीला, येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद
धाराशिव: कळंब तालुक्यातील बाभळगाव शिवारातील शेतातील गोठ्यात बांधलेले दोन बैल , एक गाय व वासरू चोरीला गेल्याची घटना ४ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, बाभळगाव येथील बाळासाहेब जगन्नाथ भातलवंडे यांच्या शेतात गोठ्यात बांधलेले दोन बैल,अंदाजे ६२००० किंमतीचे तसेच बाळासाहेब भातलवंडे यांच्या शेताचे शेजारी रामकिशन गणपती जगताप यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेले एक गाय व एक वासरू असा एकूण एक लाख 17 हजार किमतीचे जनावरे चार सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहे. अशा मजकुराचा फिर्यादी बाळासाहेब भातखंडे यांनी दि १९ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरून येरमाळा पोलीस स्टेशन येथे भा.द.वी.सं कलम ३७९ अन्वे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments